नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात दिल्लीत लाँच झालेल्या मायक्रोमॅक्स यु युटोपिया या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे. या महिन्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर मायक्रोमॅक्सने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमतही २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
मायक्रोमॅक्सच्या यु युटोपियाची विक्री सुरु
या हँडसेटमध्ये ऑनबोर्ड फिंगरप्रिंट सेंसॉर आहे. डिसेंबर २०१४मध्ये युने आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला होता. यु युटोपिया या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.२ इंचाचा असून २ गिगाहर्टझ ओक्टाकोर स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसरसह ऑपरेटिंग सिस्टम ५.१ अँड्रॉईड लॉलीपॉपची देण्यात आली आहे. यात ४ जीबी रॅम असून ३२ जीबी इंटरनल मेमरी आणि १२८ जीबीपर्यंत तुम्ही वाढवू शकता. यात २१ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.