टाटाची ‘मेगापिक्सल’ १ लिटरमध्ये धावणार १०० किमी

tata
पुणे – टाटा कंपनी सामान्य जनतेसाठी ‘टाटा’ उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘टाटा मेगापिक्सल’ ही नवीन कार घेवून येत असून ही नवी कार नॅनोला मिळालेल्या यशानंतर घेवून येत असून, ही कार १ लिटरमध्ये तब्बल १०० किलोमिटर धावरणारी आहे.

मोठय़ा उद्योग समूहाचे उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची जरी ओळख असली तरी त्यांचे नेहमीच मध्यमवर्गीसाठी बजेट कार बनविण्याचे स्वप्न होते. ही आकर्षक भेट त्यांच्या आग्रहाखातरच आणणार आहेत. नॅनोपेक्षाही काही ऍडव्हान्स फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. चार सीटरची ही कार असून, पर्यावरणाला अत्यंत अनुकूल अशी गाडी असणार आहे. एका किलोमिटर मागे केवळ २२ ग्रॅम एवढी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. रतन टाटा यांनी ही कार ५२ व्या जिनेव्हा मोटर शोमध्ये सादर केली. टाटा मेगापिक्सेल ही कार पुढील वर्षभरात बाजारत येण्याची शक्यता असून, ५ ते ६ लाख रूपयात किंमत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.