गुगलचे रेनडिअर रोबो

robot
गेल्या वर्षभरात गुगलने रोबो बनविणार्‍या अनेक कंपन्यांची खरेदी केली आहे. त्यातील बोस्टन डायनामिकस ही कंपनी विशेष प्रकारचे आणि आकर्षक व उपयुक्त रोबो बनविण्यात आघाडीवर आहे. त्यांनी नाताळचे निमित्त साधून शुभेच्छा देण्यासाठी चार पायांच्या रेनडिअर रोबोंचा प्रसिद्ध केलेला व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत आहे.

हे रेनडिअर रोबो कोणत्याही अडचणींच्या मार्गावर सहज चालू शकतात. भविष्यात त्यांचा वापर लष्करी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता दाट आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत या प्रकारचे तीन रोबो सेंटाक्लॉजच्या रूपात बसलेल्या महिलेची स्लेज ओढून नेताना दिसत आहेत. कांही दिवसांपूर्वीच या कंपनीने बिग डॉग नावाचे रोबाही सादर केले होते. हे रोबो ही अतिशय दुर्गम मार्गावरही सहज चालू शकतात. याच कंपनीने तयार केलेला चिता रोबो ताशी ४५.५ किमी वेगाने पळू शकतो. हा वेग वेगवान धावपटू उसेन बोल्टच्या वेगापेक्षा थोडा अधिकच आहे.

Leave a Comment