लग्नाचे २०१६ मध्ये कमी आहेत मुहूर्त

wedding
नवी दिल्ली : पुढील वर्षात लग्न करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी बातमी आहे. कारण लग्नाचे मुहूर्त २०१६ मध्ये कमी आहेत. दरवर्षी लग्नाचे साधारण ५० ते ६५ मुहूर्त असतात. मात्र पुढील वर्षी केवळ ४१ मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे मे आणि जूनमध्ये एकही मुहूर्त नाही. जुलैमध्ये केवळ एकच मुहूर्त आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात लग्नासाठी चार आणि मार्चमध्ये केवळ तीन मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये सर्वाधिक ११ मुहूर्त आहेत. दर तिसऱ्या दिवसाला हे मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात केवळ एकच मुहूर्त आहे. त्यानंतर १५ जुलै ते ११ नोव्हेंबरपर्यंत लग्नासाठी योग्य काळ नाही.