टोयोटोची नवी इनोव्हा नवीन वर्षात भारतात

innova
टोयोटो त्यांची नवी इनोव्हा नवीन वर्षात म्हणजे २०१६ मध्ये भारतात सादर करत आहे. ही कार इंडोनेशियात लाँच केली गेली आहे. इनोव्हाच्या जुन्या मॉडेलपेक्षा या गाडीत अधिक जागा असून अंतर्गत सजावटीतही खूप बदल गेले गेले आहेत.

इनोव्हाचे जुने मॉडेलही भारतात खूपच लोकप्रिय ठरले होते. नव्या इनोव्हाच्या डिझाईनमध्ये बदल केले गेले असले तरी तिचा ओरिजिनल क्लासिक लूक तसाच ठेवला गेला आहे. मात्र टेललाईटचा आकार वाढविला आहे आणि मोठे रियर विंडशिल्ड दिले गेले आहे. त्यामुळे कारचा रियर लूक अधिक आकर्षक बनला आहे. या कारची लांबी,रूंदी व उंची जुन्या मॉडेलपेक्षा जास्त आहे.

इंटेरियरमध्ये आकर्षक लाकडी डॅशबोर्ड, आतली जागा वाढविण्यासाठी स्लीम सीटस, दुसर्‍या लाईनीत लेग स्पेस जादा आहे व तिसर्‍या लाईनीतही स्पेशियस लेगस्पेस आहे. गाडीला २३९३ सीसीचे डिझेल इंजिन, ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, ६ स्पीड ऑटो गिअरबॉक्स अशी दोन ऑप्शन्स दिली गेली आहेत. ही गाडी भारतात १२ ते १६ लाख रूपयांच्या दरम्यान मिळेल असेही सांगितले जात आहे.