जानेवारीत लाँच होणार मर्सिडीजची ‘जीएलई ४५० एएमजी’

mercedes
नवी दिल्ली : मर्सिडीज बेंज या आघाडीच्या कंपनीने चालु वर्षांत १५ अलिशान कार बाजारात दाखल केल्यानंतर आता येत्या जानेवारी महिन्यात ‘जीएलई ४५० एएमजी’ ही नवीन अलिशान कार लाँच करणार आहे. या कारची किंमत १ कोटी रूपये असण्याची शक्यता आहे.

‘जीएलई ४५० एएमजी’च्या फ्रंट एलईडी लाईटस्, प्रंट आणि रियरवर क्रोमसह डय़ुअल एग्जॉस्ट सिस्टिम, २१ इंची व्हिलचा समावेश आहे. याशिवाय अंतर्गत भागात लेटर स्पोर्टस् स्टेअरींग व्हिल, स्पोर्टी सीटस्, लेटेस्ट कमांड इन्फोटेनमेन्ट सिस्टिमचा समावेश करण्यात आला आहे. या मोटारीत ३.० लिटरचे वी६ पेट्रोल इंजिन असून, ते ३६२ बीएचपी आणि ५३ केजीएम टार्क जनरेट करते. ५.७ सेकंदात ताशी ० ते १०० किलोमीटरचा वेग धारण करण्याची क्षमता या मोटारीत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. नो स्पीड ऑटोमॅटीक गियर बॉक्स ४ ड्रायव्हिंग मोड्समध्ये कार्यरत राहण्यात सक्षम ठरणार आहे, त्यामुळे ही मोटार अधिक आरामदायी प्रवासासह स्पोर्टी मोडमध्ये धावू शकेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.