महागड्या कार स्वस्तात खरेदीसाठी चला दुबईला

dubai
अति श्रीमंताची नगरी दुबई. मोठ मोठे महाल, हिरे सोन्याच्या वस्तू आणि महागड्या सुपरकार. पण येथील पोलीस मात्र निराळ्याच कारणाने वैतागले आहेत. ते कारण म्हणजे रस्त्यात, सार्वजनिक पार्किंग व विमानतळावर सोडून दिलेल्या बेवारस, धूळ खात पडलेल्या सुपर कार्स. बिना मालकांच्या या गाड्या गोळा करून दरवर्षी येते लिलाव केला जातो. स्पेशल सुपरकार पोलीस सेल नावाने तो प्रसिद्ध आहे. एक बरे म्हणजे या कार कुणीही माफक किमतीत विकत घेऊ शकतो.

ऐकून आश्चर्य वाटेल पण दरवर्षी पाच हजाराहून अधिक सुपरकांर या सेलमध्ये असतात. त्यात अतिमहागड्या फेरारी, पोर्शे, रोल्स राईस, मर्सिडीज, बेंटले, लोंबार्गिनी, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा कार अधिक प्रमाणात असतात. या गाड्या कुणालाही मातीमोल किंमतीत विकत घेता येतात मात्र त्यासाठी दुबईतील या लिलावासाठी जायला हवे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील बहुसंख्य गाड्या विना रजिस्ट*ेशनच्या असतात. नोंदणी केली असेल तर त्यांचे मालक बेपत्ता असतात अथवा खोटया नावावर रजिस्टर केलेल्या असतात. अतिश्रीमंत अशा गाड्या एकदोनदा वापरून टाकून देतात. कर्ज काढून गाडी घेतली असेल व चेक बाऊन्स झाला तर त्यासाठी प्रचंड दंड भरावा लागतो. तो चुकविण्यासाठी गाड्या सोडून दिल्या जातात. दुबईत अल्पवयीन मुलांकडून गाड्या चालविल्या जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. अशावेळी अपघात झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी गाड्या टाकून दिल्या जातात. विमानतळावर १५ दिवस गाडी पार्क करता येते मात्र मुदत उलटली व कार नेली नाही तर जबरदस्त दंड भरावा लागतो. तो भरावा लागू नये म्हणून मालक तिकडे फिरकतच नाहीत. व कांही गाड्या विमानतळावर क्रिमिनल्सकडूनही सोडून दिल्या जातात.

या सर्वत्र धूळ खात पडलेल्या गाड्या गोळा करून पोलिस त्यांचा लिलाव करतात

Leave a Comment