मंगळावर घेता येणार बटाट्याचे पीक

potato
मंगळावर वस्तीच्या दिशेने मानवाने भरारी घेतली असताना तेथे कोणती पिके घेता येऊ शकतील याचेही प्रयोग सुरू झाले आहेत.त्यासाठी मंगळ ग्रहाप्रमाणे वातावरण निर्मिती करून त्यात बटाट्याचे पीक घेण्याचे प्रयोग संशोधक करत असून त्याला यश आले असल्याचे समजते. मंगळावर मानवी वस्तीच्या दृष्टीने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पेरू मधील इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर आणि नासा यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग नासाच्या संशोधकांनी पार पाडला आहे. प्रयोगाचे प्रमुख संशोधक ज्युलिओ वाल्डीव्हीया म्हणाले, पृथ्वीवरचे कांही भाग आम्ही या प्रयोगांसाठी निवडले आहेत. मंगळावरील मातीशी साध्यर्म असलेले हे भाग आहेत. त्यातील पेरूच्या पंपास डी ला जोया या वाळवंटातील माती मंगळावरील मातीशी साध्यर्म असलेली आहे. तेथे मंगळासारखे वातावरण प्रयोगशाळेत निर्माण केले गेले. मंगळावर कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ९५ टक्के आहे तसेच येथे तयार केले गेले. विशेष म्हणजे या वातावरणात बटाट्याचे पीक जोमाने वाढल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment