निस्सानची पट्रोल एसयूव्ही भारतात लवकरच

nissan
निस्सानने त्यांचे पाय भारतीय बाजारात खोलवर रोवायला सुरवात केली असून त्यांची फुल साईज एसयूव्ही निस्सान पट्रोल लवकरच भारतात दाखल होत असल्याचे समजते. दिसायला दमदार आणि परफॉर्मन्सला अजोड अशी ही गाडी साधारण १ कोटी रूपयांत भारतात मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या एसयूव्हीला ५.६ लिटरचे व्ही एट इंजिन असून ते सात स्पीड ऑटो ट्रान्समिशनला जोडलेले आहे. गाडीला मॅन्युअल मोड व अॅडेप्टीव्ह शिफट कंट्रोल आहे. ५५५२ सीसीचे इंजिन, १४० लिटरची इंधन टाकी आहेच शिवाय क्रोमचा भरपूर वापर, १८ इंची व्हिल्स, ग्राऊंड क्लिअरन्स चांगला अशी त्याची अन्य वैशिष्ठ्ये आहेत. ही गाडी लिटरला ६.९ किमी अॅव्हरेज देते असेही समजते.

आठ प्रवासी आरामात प्रवास करू शकतील अशी ही गाडी लाकडी डॅशबोर्ड, आरामदायी सीटसनी सजविली गेली आहे. त्याचबरोबर मागच्या प्रवाशांसाठी व्हिडीओ एंटरटेनमेंट स्क्रीनही दिले गेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली गेली आहेच पण सामानासाठीही जागा मुबलक आहे. मागची सीट फोल्ड करता येते त्यामुळे गरजेनुसार सामानाची जागा वाढविता येते.

Leave a Comment