अॅपलची सॅमसंगकडून १८ कोटी डॉलर्स दंडाची मागणी

apple
अमेरिकन टेक कंपनी अॅपलने अमेरिकी कोर्टात दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंग विरूद्ध केस फाईल केली असून पेटंटसंदर्भातल्या या केसमध्ये पुन्हा १८ कोटी डॉलर्स रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम रूपयांत ११८७ कोटी रूपये आहे.

आयफोन डिझाईन पेटंट चोरी केल्याप्रकरणी यापूर्वी सॅमसंगने कोर्टाच्या निकालानुसार अॅपलला ५४.८० कोटी डॉलर्स दंड म्हणून दिले आहेत. मात्र अॅपलने आणखी १८ कोटी डॉलर्स दंड म्हणून सॅमसंगकडून मिळावेत यासाठी नव्याने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. सॅमसंगने अॅपल विरोधात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली असून डिझाईन चोरीप्रकरणात दंडाचा जेवढा हक्क होता त्यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम यापूर्वीच अॅपलला दिली गेली असल्याचे म्हणणे मांडले आहे. या दोन कंपन्यात २०११ पासून पेटंट वाद सुरू आहे. अॅपलने या खटल्यात २.५ अब्ज डॉलर्स नुकसानभरपाईची केस दाखल केली होती.२०१२ मध्ये या केसच्या निकाल अॅपलच्या बाजूने लागला व या महिन्यातच त्यांना ५४.८० कोटी डॉलर्स दंड म्हणून सॅमसंगने दिले आहेत.

Leave a Comment