मॅकलॉरेनची ‘६७५ एलटी स्पायइर’ लाँच - Majha Paper

मॅकलॉरेनची ‘६७५ एलटी स्पायइर’ लाँच

Mclaren
लंडन : २०१५ मधील पाचवे मॉडेल बाजारात अलिशान मोटारींची निर्मिती करणा-या ‘मॅकलॉरेन’ या ब्रिटीश कंपनीने दाखल केले असून लॉच केलेली ‘६७५ एलटी स्पायरडर’ ही कार सर्वात जास्त स्पीड देणारी ओपन टॉप कार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

या कारची अमेरिकेत किंमत ३,७२,६०० डॉलर म्हणजेच २.८४ कोटी रूपये इतकी आहे. ट्विन टर्बोचे ३.८ लिटर क्षमतेचे ८ इंजिन स्पायडरमध्ये असून, ६६६ हॉर्स पॉवर इतकी त्यांची क्षमता आहे. तसेच ५१६ पौंड फिटचे टॉर्क जनरेट करते. ही मोटार २.९ सेकंदात ताशी ६२ मैलाचे अंतर पार करते. तसेच पापणी लवण्याच्या आत ताशी २०५ मैलाचा वेग धारण करण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या मोटारीचे छत तीन प्रकारांमध्ये फोल्ड करता येते. याशिवाय १० स्पोक मेटॅलिक व्हिल हे या मोटारीचे खास आकर्षण आहे.

Leave a Comment