दक्षिण भारतात आयडियाची ४जी सेवा सादर

idea
मुंबई : दक्षिण भारतामध्ये आपली ४जी सेवा देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आयडियाने सादर केली असून आंध्र प्रदेश, तेलंगाना, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांचा यामध्ये समावेश आहे. एक निवेदन जारी करून ही माहिती कंपनीने दिली आहे.

कोची, मैसूर, विजयवाडा, तिरुचिरापल्ली आणि विशाखापट्टनमसह ७५ शहरात पहिल्या टप्प्यात आयडियाची ४जी सेवा देण्यात येणार आहे. या सेवेचा ३१ डिसेंबरपर्यंत बेळगाव, कालीकट, चित्रदुर्ग, गुंटूर, काकीनाडा, कांचीपुरम आणि तिरुचुर या शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. आयडिया सेल्युलरचे संचालक हिमांशी कपानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4जी एलटीई ग्राहकांच्या सेवेत आल्यामुळे आयडियाच्या वायरलेस ब्रॉडबँड नेटवर्कचा विस्तार होणार आहे. यामुळे कंपनीची स्थिती आणखी भक्कम होण्यास मोठी मदत होणार आहे. मार्च २०१६ पर्यंत आयडिया कंपनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोवा, पंजाब, हरियाणा, पूर्वोत्तर राज्ये आणि ओडिशामध्ये ४जी मोबाईल सेवा सादर करणार आहे.

Leave a Comment