छत्तीसगडमधील वैशिष्ठ्यपूर्ण चर्च

kunkuri
ख्रिसमसचा सण आज जगभरात साजरा होत आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील कुनकुरी गावातील चर्चही या उत्सवासाठी विशेष सजविले गेले आहे. हे चर्च आशियातील दोन नंबरचे मोठे चर्च असून वैशिष्ठपूर्ण बांधकामामुळे ते पर्यटकांनाही भुरळ घालते. हे चर्च केवळ एका बीमवर बांधले गेले आहे हे त्याचे वैशिष्ठ. येथे एकाचवेळी १० हजार लोक प्रार्थना करू शकतात इतके ते मोठे आहे.

या भागात सुमारे २ लाख ख्रिश्चन लोक आहेत. हे चर्च उभारताना पूर्णतेचे प्रतीक मानल्या गेलेल्या सात अंकाचा वापर अतिशय कुशलतेने केला गेला आहे. सदैव खुले असणारे सात दरवाजे आणि सात छते येथे आहेत. १९६२ पासून १९७९ पर्यंत त्याचे बांधकाम सुरू होते आणि त्यानंतर तीन वर्षांनी त्याचे लोकार्पण करण्यात आले. हा इंजिनिअरींगचा सुंदर नमुना स्थानिक आदिवासी मजुरांच्या सहाय्याने बांधला गेला. येथे असलेल्या सात ग्रीलवर सात ख्रिश्चन संस्कारांचा संदेश आहे. त्यात बाप्तीस्मा, परमप्रसाद, पापस्वीकार, दृढीकरण, पौरोहित्य, धन्यवाद, ज्ञापन व मिलन यांचा समावेश आहे. क्रूसावरील येशूजवळ सर्व धर्मांची प्रतीके आहेत.

Leave a Comment