क्षेपणास्त्रे बनविणार ‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ कंपनी

reliance
मॉस्को : हवेतून क्षेपणास्त्रांचा मारा ही प्रणाली विकसित करणारी रशियाची प्रमुख कंपनी ‘अलमाजआंते’ आणि भारताची ‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ यांच्या महत्त्वपूर्ण करार झाला असून भारतीय संरक्षण दलासाठी सदर कंपनी आवश्यक अशी क्षेपणास्त्रे आणि रडार प्रणालींसाठी मदत करणार आहे.

एस ४०० ट्रायंफ ही हवाई संरक्षण प्रणाली अलमाजआंतेने विकसित केली असून ही प्रणाली भारताने ४०,००० कोटी रुपयांना खरेदी करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. याबाबतची माहिती ‘अनिल धीरूभाई अंबानी गुप’चे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी प्रसिद्ध केली. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात अनिल अंबानी म्हणाले की, दोन्ही कंपन्यांकडून या कराराबाबत सर्व माहिती घेतली आहे. हवाई संरक्षण प्रणालीमधील टीओआर-१ क्षेपणास्त्र कार्यक्रम, रडार आणि ऑटोमोटेड रडार पद्धतीचा समावेश आहे. तसेच रशियन ‘अलमाजआंते’ कंपनी ‘मेक इन इंडिया’मध्येही गुंतवणूक करणार आहे.

Leave a Comment