एनसीडीच्या माध्यमातून सन फार्माकडे १ हजार कोटी जमा

sun-pharma
नवी दिल्ली – नॉन कनव्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) जारी करून दिग्गज फार्मा कंपनी सन फार्मा इंडस्ट्रीजने बाजारातून १ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम खासगी प्लेसमेंटच्या आधारावर जमा करण्यात आली असल्याचे सन फार्माकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई शेअर बाजाराला (बीएसई) सन फार्माकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १० लाखाच्या दर्शनी मूल्यांच्या विक्रीतून सन फार्मा लॅबोरेटरीने १ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. बीएसईमध्ये हे एनसीडी दोन सिरीझमध्ये लिस्ट होतील. पहिल्या यादीमध्ये ५०० कोटीचे ५ हजार डिबेंचर २४ महिन्यांसाठी सूचीबद्ध केले जाईल. तर दुस-या यादीमध्ये ५०० कोटी रुपयांचे ५००० डिबेंचर ३९ महिन्यांसाठी सूचीबद्ध होतील. कंपनीने सध्या जास्तीची माहिती दिली नाही.

Leave a Comment