युवा साहसप्रेमींसाठी कावासाकीने त्यांची नवी ऑफ रोड प्ले बाईक कावासाकी केएलएक्स ११० भारतात उपलब्ध करून दिली असून ती कावासाकी हेवी इंडस्ट्री जपानमधनू थेट आयात केली जाणार आहे. कावासाकीची ही देखणी बाईक रस्त्यावर चालविण्यासाठी नसली तरीही तिला चागंला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या डर्टट्रॅक बाईकची किमत आहे २ लाख ६५ हजार रूपये.
कावासाकीची केएलएक्स ११० भारतात
या बाईकला ११२ सीसीचे फोर स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन दिले गेले असून सीटची उंची कमी ठेवली गेली आहे. तसेच बाईकला लाँग ड्राईव्ह सस्पेन्शन दिले गेले आहे. इलेक्ट्रीक स्टार्टर सह असलेली ही बाईक किक स्टार्टही होऊ शकते. दोन्ही चाकांना ड्रम्स ब्रेक्स आहेत व बाईकचे वजन आहे ७६ किलो. हिची इंधन टाकी ३.८ लिटर क्षमतेची असून ही बाईक फक्त लाईमग्रीन रंगातच उपलब्ध आहे.