नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईतील प्रीपेड, टूजी, थ्रीजी आणि ४जी ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॅलिडिटीचे डेटा प्लान देशातील मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने लाँच केले आहेत.
एअरटेलच्या ग्राहकांसाठी नवे अनलिमिटेड व्हॅलिडिटी डेटा प्लान
दिल्लीतील ग्राहकांना या नव्या प्लाननुसार २४ रुपयांच्या रिचार्जवर ३५ एमबी, ५१ रुपयांच्या रिचार्जवर ७५ एमबी आणि ७४ रुपयांच्या रिचार्जवर ११० एमबी अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह डेटा उपलब्ध होणार आहे. तर मुंबईतील ग्राहकांसाठी २२ रुपयांत ३० एमबी, ५४ रुपयांत ८० एमबी आणि ७३ रुपयांत ११० एमबी डेटा विथ अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह मिळेल, असे कंपनीचे अधिकारी अजय पुरी यांनी सांगितले. हा प्लान २८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ग्राहकांना चांगली आणि स्वस्त सेवा उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने हा नवा प्लान लाँच करण्यात आला आहे. अनलिमिटेड व्हॅलिडिटीमुळे ग्राहकांना या प्लानचा नक्कीच फायदा होईल, असे पुरी म्हणाले.