उ.भारतात प्लॅस्टीक बंदी- उद्योगांना ५० हजार कोटींचा फटका

ban
पंजाब, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे उत्तर भारतातील प्लॅस्टीक उद्योग अडचणीत आला असून या उदयोगाला किमान ५० हजार कोटींचा फटका बसला आहे. प्लॅस्टीक बंदीमुळे १५ हजारांहून अधिक उत्पादन युनिट बंद करण्याची पाळी मालकांवर आली आहे तसेच त्यामुळे सुमारे २ लाख कामगारांच्या रोजगारावरही गदा आली आहे.

ऑल इंडिया प्लॅस्टीक इंडस्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष अजयकुमार म्हणाले दिल्लीत एक युनिट उभारायचे तर २ ते ३ कोटी रूपये खर्च येतो अन्यत्र हाच खर्च ७० ते ८० लाखांच्या दरम्यान असतो.त्यामुळे दिल्ली बाहेरच अनेक उद्योजकांनी या व्यवसायात मोठी गुंतवणूक केली होती. उत्तर भारत हा प्लॅस्टीक उद्योगासाठी मोठा बाजार आहे. आता प्लॅस्टीक व पॉलथिन बॅकवर बंदी आल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर नोकरीवरील कामगारांचे काय करायचे हाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बंदीविरोधात संघटना उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment