शेअर बाजारात ‘ईपीएफओ’ ची एन्ट्री

epfo
नवी दिल्ली : एक महत्त्वपूर्ण निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अर्थात ईपीएफओने घेतला असून ईपीएफओने आपल्या ६ लाख कोटी रुपये रिटायरमेंट कोषातून अधिकाधिक रिटर्न मिळविण्यासाठी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने शेअर बाजारात एन्ट्री केल्यामुळे नव्या वर्षात पीएफधारकांना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे.

या निर्णयानंतर सरकारने गतीने पुढे जात ईपीएफओच्या विश्वस्तांनी गुंतवणूकीच्या या पद्धतीला एक महिन्याच्या आत ट्रेड यूनियनचा विरोध असतानाही हा मार्ग स्वीकारला आहे. चालू आर्थिक वर्षात आपल्या वाढत्या जमेचे ५ टक्के ईटीएफमध्ये गुंतविण्याचा निर्णय घेतला. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ईपीएफओची वाढती जमा रक्कम १.२ लाख कोटी रुपये असेल. यातून ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकणार आहे. ईपीएफओने ३० नोव्हेंबरपर्यंत ३,१७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

ईपीएफओने पीएफची रक्कम काढण्यासाठी ऑनलाईनची सुविधा सुरू करणे तसेच आपल्या ६ कोटी अंशधारकांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे, स्मार्ट फोनच्या माध्यमातून त्यांना तात्काळ सेवा देण्यावर भर दिला आहे. तसेच व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे. ईपीएफओ अंशधारकांना देय व्याजदर वाढवू शकते. जे २०१३-१४ पासून ८.७५ टक्के आहे. तसेच आपल्या कोषावर अधिक रिटर्न प्राप्त करण्यासाठी ईपीएफओने शेअर बाजारात प्रवेश केला आहे. त्यासाठी कोषातील एक लहान हिस्सा एक्सचेंज ट्रेंडेड फंड्समध्ये गुंतविण्यास सुरूवात केली आहे.

याआधी अर्थ मंत्रालयाने गैर सरकारी भविष्य निधी कोषासाठी गुंतवणूकीसाठी अधिसूचित केले आहे. त्यानुसार त्यांना आपल्या कोषाचा किमान ५ टक्के आणि कमाल १५ टक्के भाग शेयर आधारित योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ईपीएफओने यावर्षी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन हेल्पडेस्कची सुविधेचा देखील समावेश आहे. या माध्यमातून पीएफधारक आपल्या जुन्या आणि बंद पीएफ खात्यासंबंधी माहिती घेऊ शकतात. जर पीएफ खात्यात सलग ३६ महिन्यांपर्यंत रक्कम भरणा झाली नाही तर ते खाते बंद होऊ शकते. आणि ईपीएफ या खात्यामध्ये व्याज भरणे बंद करते. मात्र खातेधारक खाते सुरू करण्यासाठी किंवा स्थानांतरासाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment