व्हिटोसला विकत घेणार विप्रो

wipro
नवी दिल्ली – अमेरिकन कंपनी व्हिटोस ग्रुपला कॅपिटल मार्केट आउटसोर्सिंगमध्ये भक्कम होण्यासाठी देशातील तिस-या क्रमाकांची सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रो खरेदी करणार आहे. विप्रो ह्या खरेदी व्यवहारासाठी ८६१ कोटी रुपये खर्च करणार असल्यामुळे विप्रोचे आउटसोर्सिंग भक्कम होण्यासाठी मदत होणार आहे.

ही माहिती विप्रोने एक निवेदन जारी करून दिली आहे. व्हिटोससोबत करार करण्यात आला असून, हा करार मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यामध्ये म्हटले आहे. व्हिटोस ग्रुपचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये आहे. ही कंपनी पोस्ट व्यापार ऑपरेशन नंतर ग्राहकांना मालमत्ता, चलन, कॉर्डर अथवा स्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक व्यवस्थापनाची प्रक्रिया आउटसोर्स करते. व्हिटोस शॅडो अकाउंटिंग प्रोसेसमध्ये अग्रगण्य कंपनी आहे. ती पूर्ण आशिया, युरोप आणि अमेरिकामध्ये आपल्या ४०० कर्मचा-यांसह सेवा देण्याचे काम करते.

तंत्रज्ञान आधारित सेवा देण्यामध्ये व्हिटोस प्रमुख कंपनी आहे. त्यामुळे करण्यात आलेला करार चांगले उत्पन्न मिळवून देईल, अशी विप्रोकडून आशा व्यक्त करण्यात आली आहे. व्हिटोसचे अधिग्रहण मार्च 2016 च्या अगोदर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment