
रेनॉल्डच्या डस्टरने भारतात अल्पावधीत खूपच लोकप्रियता मिळविली मात्र अनेकांना रेनॉल्डची आणखी एक तगडी एसयूव्ही भारतीय बाजारात आहे याची माहिती नाही. अर्थात कंपनीनेही ही गाडी भारतात लाँच करताना खूप प्रचंड विक्रीच्या अपेक्षेने आणलेली नाही मात्र नवीन एसयूव्ही खरेदीदारांनी या गाडीचाही अवश्य विचार करावा अशी तिची योग्यता आहे. युरोपिय बाजारात या गाडीने चांगलेच वर्चस्व गाजविले आहे. या एसयूव्हीचे नांव आहे कोलिऑस.
रेनॉची तगडी कोलीऑस एसयूव्ही
या एसयूव्हीला २ हजार सीसीचे डिझेल इंजिन दिले गेले असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनही आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ११ सेकंदात घेते आणि तिचे अॅव्हरेज आहे लिटरला १४.५६ किमी. कारची ताकद जबरदस्त असून या पाच सीटर गाडीचा ग्राऊंड किलअरन्सही चांगला आहे. प्रवाशांच्या मनोरंजनाची चांगली व्यवस्था आहे. बॉशचे ऑडिओ सिस्टीम, ५ स्पीकर्स, रूबवुफर, अॅंम्प्लीफायर, ब्ल्यूटूथ सारखी आधुनिक सुविधा असलेली ही एसयूव्ही पाच दरवाजांची आहे. इलेक्ट्राॅनिक सिक्सवे ड्रायव्हरसीट व इलेक्ट्राॅनिक फोर वे पॅसेंजर सीट अॅडजस्टमेंटची सूविधाही यात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी यात घेतली गेली असून गाडीची किमत आहे २३ लाख ५० हजार रूपये.
