
नवी दिल्ली – २०१५ संपण्याच्या अगोदर जगातील सर्वात मोठी सर्च वेबसाइट गुगलने भारतामध्ये मुख्य सर्च करण्यात येणा-या वेबसाइटची यादी जाहीर केली असून ई-कॉमर्स कंपन्या या यादीमध्ये अव्वल राहिल्या आहेत. गुगलवर होणा-या मुख्य १० सर्च वेबसाइटमध्ये चार ई-कॉमर्स कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फ्लिपकार्ट आघाडीवर आहे.
फ्लिपकार्ट गुगलच्या टॉप सर्चमध्ये आघाडीवर
गुगलवर नागरिकांनी रेल्वेची विविध सेवा उपलब्ध करून देणाऱया आयआरसीटीसीच्या वेबसाइटलाही मोठय़ा प्रमाणात सर्च केले आहे. यामध्ये ही वेबसाइट दुस-या क्रमाकांवर आहे. गुगलवर मोबाईल फोन सर्च करण्यामध्ये चीनची स्मार्टफोन कंपनी यु यूरेका सर्वाधिक सर्च करण्यात आली आहे. तर अॅपल दुस-या क्रमाकांवर आहे.
