जुन्या नोटा बदलण्यास सहा महिने मुदतवाढ

Notes
नवी दिल्ली: सन २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व बँकेने दिलेली मुदत ६ महिन्याने वाढवून ३० जून २०१६ पर्यंत करण्यात आले आहे.

जुन्या नोटा चलनातून बाहेर काढण्यासाठी सन २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व बँकेने ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र १ जानेवारीपासून नोटा बदलण्याची सुविधा काही विशिष्ट बँकांच्या शाखा आणि रिझर्व बँकेची ठराविक कार्यालये या ठिकाणीच उपलब्ध असणार आहे.

आतापर्यंत १३ महिन्यात २७ हजार ७५० कोटी रुपये किंमतीच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्या आहेत.

Leave a Comment