अंधांची दृष्टी प्राण्याच्या कार्निआतून परतली

cornea
बीजिंग : प्राण्याच्या डोळ्याच्या पडद्यापासून (कॉर्निया) अंधाची दृष्टी परत आणण्याची किमया चीनच्या डॉक्टरांनी घडवली. एका रुग्णाच्या डोळ्यांत हा कॉर्निआ बसवण्यात आला. आता त्या डोळ्यापासून त्याला दिसू लागले आहे. हा प्रयोग कोट्यावधी अंधांसाठी आशेचा किरण ठरू शकतो.

१० वर्षांच्या मेहनतीनंतर शँगडोंग आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी हा कॉर्निआ तयार केला. सप्टेंबरमध्ये याचे प्रत्यारोपण झाले. कॉर्निआ विभागाचे संचालक झाई हुआली म्हणाले, तीन महिन्यांचा रिकव्हरी पिरेड संपल्यानंतर रुग्णाच्या दृष्टीत सुधारणा होत आहे. चीनच्या वाँग झिंयी यांचे वय ६० वर्षे आहे. त्यांचा एक डोळा जवळपास अधू होता. तपासणीत कॉर्निआत अल्सर झाल्याचे निदान झाले. त्यांचा हा डोळा पूर्णपणे अधू होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. दरम्यानच्या कालावधीत एकॉर्नियाचा प्रयोग पूर्ण झाला होता. वाँग यांना डुकराच्या कॉर्निआपासून तयार एकॉर्निया बसवला. यामुळे त्यांना ब-यापैकी दिसू लागले आहे. प्रत्यारोपणात बायो इंजिनीअरिंग तंत्रज्ञानाद्वारे कॉर्निआत बदल केला. एप्रिलमध्ये चीनच्या अन्न व औषधी विभागाने त्याच्या उपयोगाला मंजुरी दिली. तो तयार करण्यासाठी डुकराचा कॉर्निआ मुख्य साधन होते. त्याला पेशी, हायब्रीड प्रोटीन व इतर अँटिजनपासून वेगळे करण्यात आले.

या प्रक्रियेनंतर फक्त नैसर्गिक संरचनेस बनवणारे प्रोटीन उरले होते. जे जैविकदृष्ट्या सुरक्षित होते. येथील टॉनग्रेन हॉस्पिटल व वुहानच्या झीही हॉस्पिटलसह अनेक संस्था गेल्या पाच वर्षांपासून एकॉर्निया प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय चाचण्या घेत होत्या. यात ९५% यश मिळाले आहे. मानवी डोळ्यांतील कॉर्नियाच्या प्रत्यारोपणासारखेच त्याचेही निकाल आहेत.

Leave a Comment