नवी दिल्ली – कोणताही गाजावाजा न करता ‘अॅपल’ने आपल्या ‘आयपॅड प्रो’ची भारतात विक्री सुरू केली असून आयपॅड प्रो दोन वेगवेगळ्य़ा व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून, यामध्ये ३२ जीबी व्हर्जनची किंमत ६७,९०० रुपये, तर १२८ जीबीची किंमत ७९,९०० रुपये आहे. याशिवाय ४जी सपोर्टच्या १२८ जीबीच्या आयपॅड प्रो ची किंमत ९१,९०० रुपये आहे.
भारतात ‘आयपॅड प्रो’ ची विक्री सुरू
सप्टेंबर महिन्यात आयपॅड प्रो अॅपलने लाँच केला होता. यामध्ये १२.९ इंच डिस्प्ले, ए ९ एक्स प्रोसेसर, ४ जीबी रॅम, टच आयडी स्कॅनर, १० तासांचा बॅटरी बॅकअप, मल्टी विंडोज टास्कींग आदी फिचरचा समावेश करण्यात आला. अॅपलचा ‘स्मार्ट कीबोर्ड’ आणि अॅपल ‘पेन्सिल’ही उत्पादने लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. स्मार्ट की बोर्डची किंमत १४,९००, तर अॅपल पेन्सिलची किंमत ८,६०० रुपये, असेल असे सांगण्यात आले आहे.