हरियाणा पर्यटनाचे ब्रँड ऍम्बेसिडर बनणार हेमामालिनी, धर्मेंद्र

combo
चंडीगढ – आता हरियाणाच्या पर्यटन विस्ताराला बॉलिवडू अभिनेता धर्मेंद्र आणि मथुरा मतदारसंघाच्या खासदार हेमा मालिनी प्रोत्साहन देणार असून त्यांना हरियाणाचा पर्यटन विभाग आपला ब्रँड ऍम्बेसिडर बनविणार आहे. ही माहिती हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा यांनी दिली आहे. एक फेबुवारी २०१६ मध्ये दोन्ही कलाकारांना सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात बोलाविले जाईल असे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या मेळ्यात तेलंगणा थीम राज्य आणि चीन थीम देशाच्या रुपात भाग घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले. अलिकडच्या काळात अनेक राज्यांनी पर्यटन तसेच उद्योग वाढीसाठी ब्रँड ऍम्बेसिडर नेमले आहेत. यात अमिताभ बच्चन यांना गुजरात सरकारने नेमून पर्यटन क्षेत्रात भरारी घेतली होती. तर इरफान खान यांना राजस्थानने ब्रँड ऍम्बेसिडर नेमून आघाडी घेतली आहे.

Leave a Comment