‘स्पेस एक्स’च्या रॉकेटची यशस्वी लँडिंग

space-x
वॉशिंग्टन – रॉकेटचे यशस्वी लँडिंग करत अमेरिकेची खाजगी अंतराळ कंपनी ‘स्पेस एक्स’ने इतिहास रचला आहे. रात्री ८.२९ वाजता केप कनेवरल हवाई तळावरून फाल्कन ९ रॉकेट अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. काही मिनिटात याचे यशस्वी लँडिंग देखील करविण्यात आले. खर्च कमी करणे आणि रॉकेटला पुन्हा वापरात आणण्यासाठी स्पेस एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी हा प्रयोग केला.

रॉकेट जमिनीवरून अंतराळासाठी पारंपरिक रुपाने प्रक्षेपित करण्यात येतात. अंतराळयान वेगळे झाल्यानंतर रॉकेट नष्ट होतात. फाल्कन ९ रॉकेट २३ मजली मानवरहित रॉकेट असून लँडिंगआधी याने ११ उपग्रह नॉमिनल ऑर्बिटकमध्ये पाठविण्याची कामगिरी केली. रॉकेटला अंतराळात १०० किलोमीटर पर्यंत उंच नेण्यात आले, फाल्कन ९ चा वेग २७ हजार किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक होता. त्याला लाँचिंग पॅडपासून ९.६ किलोमीटर अंतरावर लँड करविण्यात आले. सेफ लँडिंगनंतर स्पेस एक्सच्या मुख्यालयात कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Comment