भारतात अच्छे दिन येताहेत- मॉर्गन स्टॅनले

morgan
जगभरातील बड्याबड्या अर्थव्यवस्थांवर संकटाचे ढग जमू लागले असले तरी भारतात याबाबतीत तरी सगळीकडून सकारात्मक बातम्या येत आहेत. हॉवर्ड स्कूल तज्ञांपाठोपाठ आता जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी मॉर्गन स्टॅनले नेही भारतीय अर्थव्यवस्था आशादायी असल्याचा अहवाल सादर केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था धीम्या गतीने मात्र नक्कीच सुधारत असल्याचे यात म्हटले गेले आहे.

यंदाच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी ग्रोथ ७.५ टक्के याच वेगाने होईल असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. सार्वजनिक क्षेत्रात वाढलेली गुंतवणूक, व सामान्य पातळीवर कायम राहिलेली निर्यात त्यासाठी कारणीभूत असल्याचेही यात नमूद केले गेले आहे. बाहेरची मागणी, कृषी क्षेत्र व ग्रामीण खप ही थोडी काळजीची कारणे असली तरी सरकारी धोरणे व रिझर्व्ह बँकेची मुद्रा निती यामुळे भारताची स्थिती नक्कीच सुधारली असल्याचे मॉर्गन स्टॅनलेचे म्हणणे आहे.

Leave a Comment