‘गूगल’ही देणार ‘मोबाईल मेसेजिंग अॅप’

google
कॅलिफोर्निया: ग्राहकांना मोबाईलवरून मेसेजिंग आणि चॅटिंग सुविधा देणारे ‘मोबाईल मेसेजिंग अॅप’ गूगलही उपलब्ध करून देणार आहे. मात्र हे ‘अॅप’ कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्याचे नाव काय असेल; हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

गूगलची प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकच्या सुविधांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने गूगल हे ‘अॅप’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘अॅप’मध्ये मेसेजिंग आणि चॅटिंगशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘नो-हाऊ’, इंटिग्रेटेड चॅटबोट्स आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारी प्रणाली या ‘अॅप’मध्ये उपलब्ध असणार आहे.

फेसबुकच्या ‘व्हॉटस अॅप’ आणि मेसेंजर या सुविधांखेरीज टेनसेंटची ‘वी चॅट’ या सुविधा उपलब्ध आहेत. गूगलची देखील ‘हँग आऊट’ या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. गूगलच्या नव्या ‘अॅप’मध्ये या सुविधांशी स्पर्धा करण्यासाठी अधिक सुविधा देण्याचा निर्धार केला आहे.

Leave a Comment