पुढील चार दिवस बँकांचे व्यवहार ठप्प

bank-holiday
मुंबई : पुढील चार दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. ईद-ए-मिलादची २४ डिसेंबर रोजी सुट्टी असेल, तर ख्रिसमसची २५ डिसेंबर रोजी, २६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असेल, २७ डिसेंबर रोजी रविवार आहे. मात्र एटीएममध्ये शनिवारी कॅश भरण्याचे काम काही बँकाकडून करण्यात येणार आहे. यासाठी कॅश भरण्यासाठी काही कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, मात्र याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा इतर व्यवहार होणार नसल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. शनिवारी एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरण्याचे काम सुरू राहणार असल्याने कॅश काढण्यास फारशी अडचण येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment