टोयोटोची भारतात न मिळणारी फोर रनर एसयूव्ही - Majha Paper

टोयोटोची भारतात न मिळणारी फोर रनर एसयूव्ही

4runner
टोयोटोच्या इनोव्हा, फॉर्च्युनर या एसयूव्ही भारतीय बाजारात चांगली कामगिरी बजावत आहेत. मात्र याच कंपनीची फोर रनर ही एसयूव्ही भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही. ही गाडीही जबरदस्त परफॉर्मन्सची आहे आणि जगातील अनेक देशांत गेली १० वर्षे ती विकली जात आहे.

अगदी गुळगुळीत पासून ते ओबडधोबड अशा कोणत्याही परिस्थितीतील रस्त्यांवर ही गाडी चांगला परफॉर्मन्स देते. तिला ११० इंचाचा व्हिलबेस दिला गेला आहे. ४.० लिटरचे व्ही सिक्स इंजिन, पाच स्पीड इलेक्ट्राॅनिकली कंट्रोल्ड ऑटोमॅटक ट्रान्समिशनने जोडलेले गिअर, टच स्क्रीन डिस्प्लेसह मल्टीमिडीया, ऑटो वेदर कंट्रोल, हँडफ्री फोन क्षमता, यूएसबी २.० पोर्ट अशी आधुनिक सुविधा यात आहे. ब्रेकींग व सस्पेन्शन सिस्टीम उत्तम प्रकारची आहेच तसेच प्रोजेक्टर बिम हेडलाईट, एलईडी टेललाईटस, फॉग लाईटसही दिले गेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणारी व्यवस्था या एसयूव्हीत आहे. या गाडीची किंमत २२ ते २८ लाखांच्या दरम्यान आहे.

Leave a Comment