जिऑनीचा ‘मॅराथन एम ५ प्लस’ चीनी बाजारपेठेत

gionee
नवी दिल्ली : ‘मॅराथन एम५’चे लेटेस्ट व्हर्जन ‘मॅराथन एम५ प्लस’ स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील ‘जिओनी’ या चायना कंपनीने चीनी बाजारपेठेत लाँच केला आहे. जवळपास २४९९० रूपये एवढी या स्मार्टफोनची किंमत आहे. चीनी बाजारात हा फोन येत्या २५ डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, भारतात हा फोन कधी लाँच होणार याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कसा आहे जिओनीचा मॅराथन एम ५ प्लस – याचा डिस्प्ले ६ इंचाचा असून तो एमोल्डेड स्क्रीन आहे. याचे १०८०x१९२० पिक्सलस एवढे रिझोल्यूशन आहे. यात अँड्रॉईड ५.१ ऑपरेटींग सिस्टिम देण्यात आले आहे. याचा प्रोसेसर १.३ गीगा हर्टज् ऑक्टाकोरचा आहे. या ३जीबी रॅम देण्यात आले आहेत. ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज क्षमता असून १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याच्या बॅटरीची क्षमता ५०२० एमएएच एवढी आहे.

Leave a Comment