नवी दिल्ली – एक नवीन मोबाईल ऍप्लिकेशन सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने लाँन्च केले असून समाधान असे या नव्या ऍप्लिकेशनचे नाव आहे. बँकेच्या ग्राहकांना याच्या माध्यमातून सर्व मुख्य सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्राहकांना बचत खात्यातील शिलकीसह २४ तास सेवा देण्यात येणार आहे. याचबरोबर एसबीआयने समाधान ऍप्लिकेशन बरोबर अन्य ऍप्लिकेशनना जोडले आहे. यामुळे ग्राहकांना सर्व सेवा एकच ठिकाणी मिळणार असल्याने बँक एकाच ऍप्लिकेशनवर भर देणार आहे.
एसबीआयचे ‘समाधान’ ऍप्लिकेशन
ग्राहक बचत खात्यातील रक्कम, कर्ज, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ईएमआयबद्दल या माध्यमातून माहिती घेऊ शकतात. याव्यतिरिक्त बँक शाखा, एटीएम ठिकाण, बँकेला सुटी कोणत्या दिवशी असणार यासारखी माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. सीबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ऍप्लिकेशनचे लाँन्च करताना ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले.