स्वीडीश कंपनीची भारतात लढाऊ विमान उत्पादनाची तयारी

gripen
दिल्ली – स्वीडनच्या साब या संरक्षण साहित्य उत्पादन कंपनीने त्यांची ग्रायपेन ही लढाऊ विमाने भारतातच उत्पादित करण्याची तयारी दर्शविली असून या विमानांचे तंत्रज्ञानही भारताला देण्यात उत्सुकता दाखविली आहे. हा प्रस्ताव संबंधित कंपनीने भारत सरकारला सादर केला आहे. ग्रायपेन ही पाचव्या पिढीची अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार २०११ मध्ये या कंपनीने भारतीय वायूदलासाठी मिडीयम मल्टीरोल कॉम्बॅट विमाने पुरवठ्यासाठीचे कंत्राट मिळविण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी हे कंत्राट फ्रेंच कंपनीने मिळविले होते. साबने भारताला सादर केलेल्या प्रस्तावात ग्रायपेन मिर्मिती आणि तंत्रज्ञानच नाही तर पुढील १०० वर्षे विमान क्षेत्र विकासात मदत करण्याची तयारीही दाखविली असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment