नवीन वर्षात बिसलेरी सॉफ्ट ड्रींकस विकणार

bislery
बाटलीबंद पाण्यासाठी प्रसिद्ध असलेली बिसलेरी इंटरनॅशनल नवीन वर्षापासून सॉफ्ट ड्रींक बाजारात पुनरागमनाच्या तयारीत असल्याचे समजते. बिसलेरीने २०२० सालापर्यंत २ हजार कोटीच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी शीतपेये व्यवसाय विस्ताराचा मोठा हातभार लागेल असे संचालक आर.के. गर्ग यांनी सांगितले. जवळजवळ दोन दशकांच्या गॅपनंतर बिसलेरी सॉफ्ट ड्रींक क्षेत्रात वापसी करत असून त्यासाठी १०० कोटींचे बजेट मंजूर केले गेले आहे.

चालू वर्षात बिसलेरीची उलाढाल ७०० कोटींवर गेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ती २० ते २५ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे बिसलेरीने त्यांचे लोकप्रिय ब्रँड थम्सअप, लिम्का, गोल्ड स्पॉट, माझा व सिट्रा १९८३ मध्ये कोकाकोलाला विकले होते. त्यावेळी बिसलेरीने कोकाकोलाशी या क्षेत्रात प्रतिस्पर्धी म्हणून उतरायचे नाही असा करारही केला गेला होता. त्याची मुदत २००८ साली संपली असल्याने बिसलेरी पुन्हा एकदा सॉफटड्रींक क्षेत्रात पदार्पणास उत्सुक आहे. यावेळी ते लेमन, स्पायसी, मँगो, पाईनाकोला स्वादाची पेये बाजारात आणणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment