मोबाईल डेटा पॅकच्या दरात वाढ करणार आयडिया ?

idea
नवी दिल्ली : मोबाईल डेटा पॅकच्या दरात वाढ करण्याच्या विचारात भारतातील टेलिकॉम कंपनी आयडिया आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी हा निर्णय मार्जिन सुधारण्यासाठी घेण्याच्या विचाराधीन आहे.

याबाबतची घोषणा पुढील काही आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ स्पेशल स्कीमअंतर्गत ३० दिवसांच्या एक जीबी डेटा पॅकसाठी आता आयडिया १२३ रुपये आकारत आहे. या किंमतीत वाढ होऊन ती १५० पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. नुकतीच आयडियाने कोलकातामध्ये थ्रीजी सर्व्हिससाठी स्वत:चे २१००MHzचे स्पेक्ट्रम बँड लावण्याची घोषणा केली.

Leave a Comment