कॉल ड्रॉप झाल्यास कडक कारवाई – रविशंकर

ravi-shankar
नवी दिल्ली – दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दूरसंचार कंपन्यांनी व्यवसाय वाढ व ग्राहक हित या दोन्हींचा विचार केला पाहिजे, कॉल ड्रॉप झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले असून दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल सेवा वाढवली आहे त्याबाबत त्यांची मी प्रशंसा करतो, त्याचबरोबर त्यांनी सेवेची गुणवत्ता वाढवली पाहिजे. कॉल ड्रॉपच्या तक्रारी आल्या तर मी कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यांना मी ही समस्या समजावून दिली आहे व आता ते प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सांगितले की, कंपन्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर अनेक उपाय करीत आहेत. याबाबत त्यांनी चांगली कामगिरी करणे अपेक्षितच आहे. नियामकाचे काम ट्रायने करावे, नियंत्रकाचे नव्हे, अशी सूचना फिक्कीच्या एका प्रतिनिधीने केली असता दूरसंचार तक्रार प्राधिकरणाचे त्यांनी समर्थन केले.

जर गुणवत्तेची अपेक्षा ट्रायने केली तर कंपन्यांना त्याची पूर्तता करावी लागेल, दुसरीकडे बोट दाखवून चालणार नाही, जर कंपन्यांनी चांगली सेवा दिली तर त्यांच्या पाठीशी उभा राहणारी मी पहिली व्यक्ती असेन हेही लक्षात ठेवा’, असे प्रसाद म्हणाले.

Leave a Comment