विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध

[nextpage title=”विज्ञान क्षेत्रात २०१५ मध्ये लागलेले महत्त्वाचे शोध”]
collarge
निरोप घेण्याच्या शेवटच्या पायरीवर असलेले २०१५ चे वर्ष संशोधकांसाठी फार महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षात संशोधकांच्या संशोधनातून अनेक महत्त्वाची रहस्ये उकलली गेली. मंगळावर पाणी असल्याचा शोध, नव्या आकाशगंगेचा शोध, आकाशगंगेतील धुमकेतू, पृथ्वीच्या सर्वात जवळ आलेला ग्रहणग्रस्त सुपरमून याच वर्षात पाहिला गेला आहे.[nextpage title=”१)मंगळावरील पाण्याची शक्यता”]
1-mars-water
मंगळावर भविष्यात वस्ती करता येण्याच्या दृष्टीने तेथे आढळलेले हिमखंड अत्यंत महत्त्वपूर्ण आहेतच पण मंगळ हा उजाड ग्रह नाही हेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. नासाचे रोव्हर हे अंतराळयान २०१२ पासून मंगळाची अनेक निरीक्षणे नोंदवित आहे आणि तेथील फोटो सातत्याने पृथ्वीवर पाठवित आहे. त्यातूनच मंगळावर नद्यांच्या खुणा आढळल्या आहेत. नासाचे खगोल विभागातील संशोधक जिम ग्रीन यांच्या म्हणण्यानुसार जीवन अस्तित्वात येण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि मंगळावर ती शक्यता दिसल्याने तेथे वस्तीही शक्य होणार आहे. मंगळावर सापडलेल्या १३० फूटाच बर्फाच्या खंडामुळे संशोधकांत उत्साह संचारला आहे.[nextpage title=”२)इलेक्ट्राॅनिक रोप”]
2-electronic-tree
वनस्पतीच्या रोपाच्या संवाहन यंत्रणेत इलेक्टॉनिक सर्कीट लावून इलेक्टॉनिक रोपे बनविण्यात संशोधकांनी यश मिळविले आहे. हे यश म्हणजे वनस्पतीशास्त्रातील नवीन युगाची सुरवात मानले जात आहे. स्वीडनच्या लिकोपिंग विद्यापीठातील तज्ञांनी वनस्पतीच्या रोपात तारा, डिजिटल लॉजिक घालण्यात यश मिळविले व त्यामुळे वनस्पती विज्ञानात विकास होण्यासाठी नवीन उपकरणे विकसित करण्यास सहाय्य होणार आहे.[nextpage title=”३) जेम्स वेब दुर्बिणीवर फ्लाईट मिरर”]
3-james-web
नासाने जेम्स वेब दुर्बिणीवर पहिला फ्लाईट मिरर लावण्यात यश मिळविले. असे १८ फ्लाईट मिरर या दुर्बिणीवर लावले गेले आहेत. २०१८ मध्ये सध्याच्या हबल दुर्बिणीच्या जागी ही दुर्बिण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा बदल फारच महत्त्वाचा आहे. नासाचे जॉन गर्न्सफेल्ड यांच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स वेब ही पुढील शतकातील प्रमुख खगोल वेधशाळा असेल.[nextpage title=”४)मंगळावर आढळलेल्या विविध आकृत्या”]
4-mars
मंगळावर केस मोकळे सोडलेली बाई, उड्या मारणारे उंदीर, खड्यातील माकडे, प्रचंड मोठी बुद्ध मूर्ती आढळल्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली आणि लोकांची करमणूकही झाली. अर्थात हे सत्य असणे शक्य नाही असे लक्षात आले तरी शेवटी हे फोटो नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने पाठविलेले असल्याने ते गंभीरपणे घेणे भाग होते.[nextpage title=”५) सुपर मून”]
5-super-moon
पूर्ण चंद्राच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ असेल तर त्याला सुपरमून म्हटले जाते. असा योग वर्षातून एक दोनदा येतोही. मात्र २०१५ साल त्यासाठी विशेष ठरले. कारण सप्टेंबरच्या २७ तारखेच्या पौर्णिमेला दुर्लभ अशी खगोलिय महत्त्वाची घटना घडली. या दिवशी सुपर मून होताच पण त्याचदिवशी चंद्रग्रहणही झाले.एरवी सर्व चंद्रग्रहणे पौर्णिमेला होतातच पण सुपरमून असनाता चंद्रग्रहण हा दुर्मिळ योग असतो.[nextpage title=”६) जीसॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण”]
6-g-sat
भारताच्या जी सॅट १५ या उपग्रहाचे फ्रेंच गियाना येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले गेले.[nextpage title=”७) डायनासोरचे पंख, त्वचा असलेले जीवाश्म”]
7-dinasour
कॅनडात डायनासोर या नामशेष झालेल्या प्रजातीचे पंख, त्वचा आणि शेपूट असलेले जीवाश्म सापडले. हा शोध अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे सध्याच्या चिमण्या व डायनासोर यांच्या संबंधावर प्रकाश पडणार आहे. डायनासोरमध्ये कसे बदल होत गेले याची उकल यामुळे होऊ शकणार आहे.[nextpage title=”८)आकाशगंगेच्या नव्या भागाचा शोध”]
8-galaxy
आकाशगंगेतील एक नवा भाग शोधण्यात संशोधकांना यश मिळाले. आजपर्यंत आकाशगंगेच्या मध्यात जुने तारे असतात असा समज होता. मात्र संशोधकांनी आकाशगंगेच्या दाट धूळ व ढगात झाकल्या गेलेल्या भागात नवीन तारे म्हणजे कमी वयाचे तारे असल्याचेही सिद्ध केले आहे.[nextpage title=”९)ऑक्सिजन असलेला धूमकेतू”]
9-dhumkketu
ऑगस्टमध्ये सूर्याजवळून गेलेल्या धूमकेतूत ऑक्सिजनचे कण प्रथमच संशोधकांना आढळले. ६७ पी चुरयुमोव गेरोसिमेंको हा धूमकेतू निर्माण होत असतानाच त्यात ऑक्सिजनचे रेणू अस्तित्वात असावेत असे संशोधकांचे म्हणणे आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा अंतराळयानाने वर्षभर या धूमकेतूची निरीक्षणे केली तेव्हा ही बाब उघडकीस आली.[nextpage title=”१०)पृथ्वीवर कधी अवतरले जीवन”]
10-earth
पृथ्वीवर पहिला सजीव ३० कोटी वर्षांपूर्वी नाही तर किमान ४.१ अब्ज वर्षांपूर्वी आला असा महत्त्वपूर्ण शोध शास्त्रज्ञांनी लावला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना दीर्घ अभ्यासानंतर असे समजले की एखादा ग्रह साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असेल तरच त्यावर सजीव सृष्टीची सुरवात होऊ शकते.[nextpage title=”११) भारतात १७६ नवीन प्रजाती”]
11-india
भारतात संशशेधकांना प्राण्यांच्या १७६ नवीन प्रजातींचा शोध लागला आहे. त्यात ९३ प्रकारचे पतंग, २३ प्रकारचे मासे, बेडूक आणि विषारी बेडकांच्या २४ प्रजाती, १२ प्रकारचे कोळी, खेकड्यांसारखे १२ प्रकारचे प्राणी यांचा समावेश आहे.[nextpage title=”१२) जगातली पहिली हत्या”]
12-murder
जगात पहिली हत्या कधी झाली असावी याचा अंदाज संशोधकांनी सापडलेल्या पुराव्यांवरून बांधला आहे. त्यानुसार जगातील पहिली हत्या स्पेनमध्ये ४,३०,००० वर्षांपूर्वी झाली असावी. कारण येथील एका गुहेत सापडलेल्या सर्वात जुन्या कवटीवर घाव असल्याचे त्यांना दिसून आले आहे. या प्रकारचे २८ अवशेष येथे सापडले आहेत.[nextpage title=”१३)सैतानी तारा “]
13-devil
नासाच्या हबल दुर्बिणीने आकाशगंगेत नवीन विचित्र स्वभावाचा तारा शोधला आहे. याच्या वर्तणुकीवरून त्याला सैतान असे नांव शास्त्रज्ञांनी दिले आहे. हा तारा अन्य तार्‍यांकडून प्रकाश चोरत असल्याचे संशोधकांना आढळले आहे.

Leave a Comment