बाजारात आला ३७९९ रुपयांचा ‘नेक्सियन’ स्मार्टफोन

nexian
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँड ‘नेक्सियन’ हा स्मार्टफोन देशातील आघाडीची मोबाईल बनवणारी कंपनी स्पाईसने भारतीय बाजारात आणला असून स्पाईसने यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टशी करार केल्यामुळे हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवरच खरेदी करता येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना स्पाईस मोबाईलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमनदीप सिंह यांनी सांगितले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त तरुण असल्यामुळे स्मार्टफोनसारख्या बाजाराला येथे मोठी मागणी आहे. याच तरुणांचे स्मार्टफोनप्रेम पाहून आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन ब्रँड नेक्सियन भारतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरु खरेदी करता येणार आहे.

नेक्सियन एनव्ही ४५ चे खास फीचर्स: यात ४.५ इंचाचा ड्रॅगनट्रेल डिस्प्ले असून १जीबी रॅम आणि ८जीबी रोम त्याचबरोर १.२ स्प्रेडट्रुम SPRD ७७३१ क्वॉड कोर प्रोसेसर यात आहे. या ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ४.४.२ किटकॅटवर आधारित आहे. याचा रियर कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा ऑटो फोकस आणि फ्रंट कॅमरा ३.२ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन ड्युल सिम फोन असून यात सीडीएमए आणि जीएसएम दोन्हींसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये वाय-फायसारखे कनेक्टिव्हिटीसाठी फीचर्स देखील आहेत. याची ३२जीबी पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment