नव्या वर्षात धूम उडविणार हे दहा स्मार्टफोन

[nextpage title=”नव्या वर्षात धूम उडविणार हे दहा स्मार्टफोन”]
collarge
स्मार्टफोन हा आजकाल जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनाही ग्राहकांच्या या सॉफ्ट कॉर्नरची पुरेपूर जाणीव झाली असल्याने या कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर नवनवी मॉडेल्स ग्राहकांपुढे सादर करत आहेत. नवीन वर्षात म्हणजे २०१६ मध्येही अशीच आकर्षक स्मार्टफोन लॉचिंगची परंपरा पाळली जाणार आहे मात्र त्यातील हे दहा स्मार्टफोन ग्राहकांना नक्कीच लुभावतील. यातले काही खूपच यशस्वी होतील तर कांही काळाच्या स्मृतीत गडपही होतील. इतकेच नव्हे तर यातला कोणता फोन घ्यावा या बद्दल त्यांची मनस्थिती द्विधा करतील असे तंत्रज्ञान जाणकारांचे मत आहे. कोणते आहेत हे स्मार्टफोन?[nextpage title=”१)आयफोन सेव्हन, प्लस आणि सिक्स सी”]
1-iphone
अॅपलचा नवीन फोन म्हणजे चर्चेला अंत नाही अशी परिस्थिती असते. वरील तिन्ही फोनच्या बाबतीतही ती खरी आहे. दरवर्षी अॅपल कडून नवीन मॉडेल्स सादर केली जातात त्यानुसार यंदाही आयफोन सेव्हन, प्लस व सिक्स सी सादर केले जाणार आहेत.अफवांवर विश्वास ठेवायचा तर सेव्हन व प्लससाठी अपग्रेड हार्डवेअर असेल म्हणजे झिपर प्रोसेसर, जादा रॅम, नवीन हेडफोन कनेक्टर, मोठा देखणा स्क्रीन व वॉटरप्रूफ. या दोन फोनपूर्वीच आयफोन सिक्स सी येईल तो फाइव्ह सीला रिप्लेस करेल. या फोनसाठी फाईव्ह एसचे फिचर्स व अॅपल पे सपोर्ट आणि मेटॅलिक फ्रेम असेल असे समजते.[nextpage title=”२) एलजी जी फाईव्ह”]
2-lg-g5
एलजी त्यांच्या फ्लॅगशीप स्मार्टफोन २०१६ मध्ये फोर के डिस्प्ले, कंपनीची पेमेंट सर्व्हीस,२० एमपी चा कॅमेरा व आयरिस स्कॅनर देणार असल्याची चर्चा जोरात आहे. एलजीने आयरिस स्कॅनर तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या आयरियन्स कंपनीशी भागीदारीचा करार केला आहे. त्यांच्या नवीन फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० प्रेासेसर, रिमुव्हेबल ४००० एमएएच बॅटरी ही खास फिचर्स असतील.[nextpage title=”३)एचटीसी वन एम टेन”]
3-htc-m-one-10
एचटीसी दरवर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दरम्यान त्यांचा नवा फोन सादर करते. यंदाही नवीन फ्लॅगशीप फोर के अल्टा हाय डेफिनेशन डिस्प्ले सह व ३५०० एमएएच बॅटरीसह त्यांचा नवा फोन येईल असे सांगितले जात आहे. त्याला स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, यूएसबी टाईप सी कनेक्टर आणि चांगला कॅमेराही असेल.[nextpage title=”४)गुगल प्रोजेक्ट अॅरा”]
4-google-project-ara
लेगोप्रमाणेच स्वतःचा स्मार्टफोन स्वतःच्या गरजेनुसार असेंबल करण्याची सुविधा असलेला हा फोन अपग्रेड करण्यासाठीही अगदी सोपा असेल. मॉड्युलर फोन कन्सेप्ट हाच मुळी स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती घडविणारा अस्पेक्ट आहे. या फोनमधील प्रत्येक पार्ट स्वॅपेबल असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या चॉईसनुसार फोन मिळणार आहे. हा फोन २०१६ च्या अखेरी बाजारात येईल असे समजते.[nextpage title=”५)नेक्स्ट बिट रॉबिन”]
5-nextbit
किकस्टार्टवर डेब्यू केलेला हा फोन ज्या युजरना फोनची मेमरी कमी पडते त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे. त्याची स्टोरेज स्पेस ३२ जीबीची असली तरी तो क्लाऊड कनेक्ट आहे आणि व्हिडीओ, फोटो तसेच क्वचित वापरली जाणारी अॅप्स यात आपोआप क्लाउड स्टोरेजमध्ये पाठविली जाणार आहेत. यात क्लाऊड स्टोरेज १०० जीबीचे आहे. हा फोन भारतात कधी येणार हे आत्ताच सांगता येणार नाही.[nextpage title=”६)शिओमी एम वन फाइव्ह”]
6-xaiomi
नुकत्याच लिक झालेल्या फोटोंनुसार शिओमी ही चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसरसह नवीन फोन सादर करणार आहे. त्याला ४जीबी रॅम, यूएसबी टाईप सी कनेक्टर, फिंगरप्रिंट स्कॅनर कम होम बटण, ५ इंची स्क्रीन, १६ एमपीचा प्रायमरी शूटर कॅमेरा, ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा, अँड्राईड मार्शमेलोवर आधारित एमआययूआय ओएस आणि मेटल बॉडी असेल.[nextpage title=”७)मायक्रोसॉफ्ट सरफेस फोन”]
7-microsoft-surface
मायक्रोसॉफटचा हा नवा फोन ६४ बिट इंटेल प्रोसेसरसह आणि अपग्रेडेड विंडोज १० सह येईल. त्याला ५.५ इंची अमोलेड डिस्प्ले, २१ एमपीचा प्रायमरी तर ८एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि यूएसबी टाईप सी कनेक्टरही असेल.[nextpage title=”८)सोनी एक्सपिरीया झेड सिक्स”]
8-sony
सोनीच्या या फोनबाबत ते कोणता कॅमेरा देणार याची उत्सुकता अधिक आहे. कारण स्मार्टफोनसाठी दिले जात असलेले बहुतेक सर्व कॅमेरे सोनीचे आहेत.[nextpage title=”९) ब्लॅकबेरी व्हिएन्ना आणि व्हेनिस”]
9-blackberry
अँड्राईड ओएसचा व्हिएन्ना हा कँडीबार फोन फिजिकल कीबोर्डसह तर व्हेनिस स्लायडरसह असेल. फ्लॅगशीप स्पेसिफिकेशन्स असलेला व्हिएन्ना ब्लॅकबेरी लिपसारखा दिसतो आहे आणि तो स्वस्तही असेल. व्हेनिससाठी स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ५.४ इंची अमोलेड डिस्प्ले,१८ एमपीचा फास्ट फोकस कॅमेरा व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स असतील.[nextpage title=”१०) सॅमसंग गॅलेक्सी एस सेव्हन,एस सेव्हन एज”]
10-samsung
सॅमसंग त्यांची अपग्रेडेड एस सेव्हन रेंज नवीन वर्षात सादर करेल. स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, ४ जीबी पेक्षाही अधिक रॅम, उत्तम दर्जाचे ग्राफिक प्रोसेसर, अॅमोनेड डिस्प्ले, हार्टबीट मॉनिटर, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अँड्राईड मार्शमेलो अशी त्याची फिचर्स असतील.

Leave a Comment