मुंबई: महिंद्रा एस १०१चे कंपनीने महिंद्रा केयूव्ही १०० असे नव्याने नामकरण केले असून ही गाडी १५ जानेवारी २०१६ रोजी बाजारात पदार्पण करणार असून त्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. बॉलीवूडमधील अभिनेता वरुण धवन महिंद्रा केयूव्ही १०० चा ब्रँड अंबेसेडर असणार आहे.
महिंद्रा केयूव्ही १०० साठी नोंदणी सुरू
महिंद्रा केयूव्ही १०० या एसयूव्ही श्रेणीतील गाडीला महिंद्रा एस १०१ पेक्षा अधिक शक्तिशाली इंजिन बसविण्यात आले आहे. महिंद्राने सन २०१५-१६ मध्ये एकूण १० नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी आतापर्यंत ७ मॉडेल्स बाजारात आली आहेत. नव्याने बाजारात येणाऱ्या महिंद्रा केयूव्ही १०० च्या एक हजार गाड्यांचे उत्पादन पूर्ण झाले आहे.
कंपनीने महिंद्रा केयूव्ही १०० साठी ३० वर्ष वयोगटावर लक्ष केंद्रित केले आहे. या वयोगटाला गाडी चालविण्याचा थरार अनुभवता यावा यासाठी केयूव्ही १०० मध्ये आवश्यक त्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. याच वयोगटातील ग्राहकांना साजेसे ‘कूल युटीलीटी व्हेईकल’ असे नामकरण करण्यात आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. एम फाल्कनचे शक्तिशाली; मात्र वजनाला सर्वात हलके अॅल्युमिनियम पासून बनविलेले इंजिन असलेली ही गाडी डीझेल आणि पेट्रोल या दोन्ही आणि ७ रंगात पर्यायात उपलब्ध आहे.
Best KUV 100
Mahindra