बेळगावच्या अवलियाचे खराखुरा ‘शॉक’ देणारे हातमोजे

socks
बेळगाव : यापुढे महिलांची छेडछाड करणे टवाळखोरांना चांगलेच महागात पडू शकते. कारण बेळगावातील एका विद्यार्थ्याने छेडछाड करणाऱ्यांना ‘झटका’ देण्यासाठी उपकरण तयार केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे हे उपकरण असून हे उपकरण बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव महांतेश होसमनी असे आहे.

बेळगावातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रोड रोमिओंना झटका देणारे एक उपकरण बनवले असून तरुणी किंवा महिला निर्मनुष्य रस्त्यावरून जात असताना त्यांची छेडछाड करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशा प्रसंगी महिलांच्या सुरक्षेसाठी हातमोज्याप्रमाणे असणारे हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.

हे मोजे अडचणीत असणाऱ्या तरुणीने हातात घालायचे आणि छेडछाड करणाऱ्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श केल्यास त्या व्यक्तीला शॉक बसतो. शॉकमुळे छेडछाड करणारा मागे तरी हटेल किंवा बेशुध्द तरी पडेल.

हे उपकरण बेळगावातील के. एल. इ. इंजिनियरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशनच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या महांतेश होसमनी नावाच्या विध्यार्थ्याने केवळ ५०० रुपये खर्चून बनवले आहे. महिला हे मोजे हातामध्ये बांधून किंवा पर्समध्ये ठेऊन फिरू शकतात. सध्या या उपकरणाचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment