फोक्सवॅगनची बिटल भारतात दाखल

beetal
दीर्घ प्रतीक्षेनंतर फोक्सवॅगनची नवी बिटल भारतात उपलब्ध केली गेली असून तिची किंमत आहे २८ लाख ७३ हजार रूपये. नोव्हेंबरच्या मध्यापासूनच या गाडीच्या बुकींगची सुरवात झाली होती. ही गाडी न्यू जनरेशनची असली तरी तिचे डिझाईन ओरिजिनल कारच्या जवळचेच असल्याचे कारनिर्मात्यांचे म्हणणे आहे.

नव्या बिटलचे हेडालाईट नवीन पद्धतीचे असून त्यात एलईडी डे टाईम रनिंग लाईटसही दिले गेले आहेत. ही कार दिसायला आकर्षक आणि जुन्या मॉडेलपेक्षा लांबी रूंदीला थोडी जास्त आहे त्यामुळे आतील जागा प्रशस्त झाली आहे. स्टीअरिंग, सेंटर कन्सोल, इन्स्ट्रूमेंटेशन मॉडर्न लूकचे असून गाडीला पेट्रोल इंजिन आहे. तसेच सात स्पीड डीएसजी गिअरबॉक्सही दिला गेला आहे. ही कार ऑरेंज, व्हाईट, रेड व ब्ल्यू सिल्क अशा चार रंगात उपलब्ध आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घेण्यात आल्याचाही कंपनीचा दावा आहे.