नवी दिल्ली : गूगल नेक्ससकडून स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना मोठी ऑफर असून गूगल नेक्सस ५एक्स हा स्मार्टफोन अमेझॉनवर २२ हजार ९०० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला असून ज्याची मूळ किंमत ३१हजार ९९० रुपये आहे. तर गूगल नेक्सस ५एक्सचे ३२ जीबीवाले मॉडेल ३३ हजार ९५० रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्याची मूळ किंमत ३५ हजार ९०० रुपये आहे. या स्मार्टफोनची अमेझॉनवर सवलतीसह विक्री सुरु झाली आहे. मात्र, गूगलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
गूगलच्या नेक्सस ५एक्सवर ९ हजार रुपयांची घसघशीत सूट
कसा आहे नेक्सस ५एक्स – याचा डिस्प्ले एचडी असून तो २ इंचाचा आहे. तर त्याचे पिक्सेल रिझॉल्युशन १०८०×१९२० आणि पिक्सेल डेन्सिटी ४२३ पीपीआय एवढी आहे. याचा प्रोसेसर ८GHz हेक्सा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८०८चा आहे. यात रिअर कॅमेरा ३ मेगापिक्सेल आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा ५ मेगापिक्सेल आहे. यात २ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल मेमरी १६ जीबी असून फोनमध्ये एसडी कार्ड सपोर्टिव्ह देण्यात आले नाही. यात मार्शमॅलो अँड्रॉईड व्हर्जन ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आहे. गूगल नेक्सस ५एक्स हा स्मार्टफोन नॅनो सिम सपोर्टिव्ह असून यामध्ये २७००mAh क्षमतेची बॅटरी आहे. ३जी आणि ४जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन आहे.