जिओनीचा ५०२० एमएएच बॅटरीवाला एम फाईव्ह प्लस येतोय

m5
जिओनी या चिनी कंपनीने गेल्या महिन्यातच त्यांचा मॅरेथॉन एम फाईव्ह स्मार्टफोन सादर केला असून त्याचे पुढचे व्हर्जन एम फाईव्ह प्लस नावाने २१ डिसेंबरला लाँच केले जात असल्याचे वृत्त चिनी वेबसाईट टेनाने दिले आहे. या फोनसाठी ५०२० एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.

अन्य फिचर्समध्ये ६ इंची अमोलेड डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड ५.१ लॉलीपॉप ओएस, १३ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा यांचा समावेश आहे.

Leave a Comment