आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमध्ये

bridge
भारतीय रेल्वेने जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात जगातील आश्चर्यात समावेश होऊ शकेल असा रेल्वे पूल उभारला असून त्याचे उद्धाटन मार्च २०१६ मध्ये होणे अपेक्षित आहे. चिनाब नदीवर उभारलेला हा पूल ३५९ मीटर उंचीवर आहे. त्याची उंची आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटरने अधिक आहे आणि त्याची लांबी आहे १३१५ मीटर.

हा पूल भारतीय रेल्वेच्या मानबिंदू ठरणार असून तो इतक्या उंचीवर असूनही खूपच मजबूत आहे. आठ रिश्टर स्केलचा भूकंपही या पुलाला नुकसान पोहोचवू शकणार नाही असे समजते. हा पूल सुरू झाल्यानंतर जगातील तो सर्वाधिक उंचीवरचा रेल्वे पूल असेल असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. हा पूल उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला यांना जोडेल. भारतीय रेल्वेच्या इतिहासात स्वतंत्र भारतातील हा पहिलाच चॅलेंजिंग प्रोजेक्ट असून त्यासाठी ५२१ कोटी रूपये खर्च आला आहे. या पुलाचे आयुष्य १२० वर्षांचे अ्राहे. हिमालयाच्या दुर्गम पहाडी भागात असा पूल म्हणजे अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील एक अजोड नमुना आहे.

Leave a Comment