जयपूर – येथे सितापुरा भागात भरत असलेल्या ज्युवेलरी शोमध्ये यंदा एक हिर्याची अंगठी चर्चेचा विषय बनली आहे. तब्बल ३८२७ हरे जडविलेली ही अंगठी १८ कोटी रूपये किमतीची आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या ३० तारखेलाच या अंगठीने सर्वाधिक कट डायमंड जडविलेली अंगठी म्हणून गिनीज बुकमध्ये तिचे नांव कोरले आहे. अर्थात तुमच्याकडे अंगठी विकत घेण्याइतके पैसे असले तरीही ती तुम्हाला विकत घेता येणार नाही कारण ती नॉट फॉर सेल कॅटेगरीतील आहे.
रिंग वुइथ गन अंगठी १८ कोटींची
या अंगठीविषयी जोरदार चर्चा सुरू असण्यामागे केवळ तिची किंमत हे कारण नाही. या अंगठीचे नामकरण रिंग वुइथ गन असे केले आहे कारण तिच्या संरक्षणासाठी दोन बंधूकधारी सतत आसपास आहेत. दोन सीसीटिव्ही कॅमेरे तिच्यावर पाळत ठेवून आहेत. अभिषेक व आशीष सांड यांनी या अंगठीचे डिझाईन केले आहे. सतत तीन वर्षे ही अंगठी बनवली जात होती. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोराच्या आकारातील ही अंगठी १८ कॅरट गोल्डमध्ये बनविली गेली आहे आणि तिच्यातील हिर्यांचे वजन आहे १६.५ कॅरट.