७६ टक्के भारतीयांना समजत नाही व्याज दरासारख्या संकल्पना

s&p
नवी दिल्ली – जागतिक तुलनेत भारतामध्ये आर्थिक साक्षरता कमी असून त्यांना महागाई दर तसेच व्याज दरासारख्या संकल्पना समजत नाहीत. यासाठी देशातील विविध आर्थिक संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे एसएंडपी रेटिंगने सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे.

आशियामध्ये सिंगापूरमध्ये आर्थिक साक्षरता ५९ टक्के आहे. त्यानंतर हाँगकाँग तसेच जपान (दोन्ही ४३ टक्के) यांचे स्थान आहे. चीनमध्ये (२८ टक्के) प्रौढ आर्थिक साक्षर आहेत. मात्र आर्थिक साक्षरतेचे प्रमाण भारतामध्ये अतिशय कमी असून जवळपास ७६ टक्के भारतीय आर्थिक साक्षर नाहीत. त्यांना चक्रवाढ व्याज, महागाई दर यासारख्या प्रमुख आर्थिक धोरणांबाबत आवश्यक ती माहिती नसल्याचे सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे.

जागतिक सरासरीपेक्षा ही आर्थिक साक्षरता कमी असून इतर ब्रिक्स देशांच्या तुलनेत सुंसंगत आहे. जागतिक स्तरावर ६६ टक्के प्रौढ साक्षर नाहीत. यामध्ये पुरुष आणि महिला यामधील अंतर प्रत्येक देशामध्ये आहे. जागतिक स्तरावर ६५ टक्के पुरुष आर्थिक साक्षर नाहीत तर ७० टक्के महिलांना आर्थिक धोरण समजत नाही. भारतामध्ये हे प्रमाण अधिक आहे. येथे ७३ टक्के पुरुष आर्थिक परिभाषा समजत नाहीत. तर ८० टक्के महिला आर्थिक साक्षर नाहीत.

Leave a Comment