ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही फेसबुक

facebook
मुंबई: आता ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक उतरली असून फेसबुक आता उबेर कॅब वापरणाऱ्यांच्या मदतीला धावून येणार आहे. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून लवकरच उबेर कार बुक करता येईल.

उबेर फेसबुकच्या ट्रान्सपोर्टेशन फील्डमध्ये त्यांचे पहिले भागीदार झाले आहे. आता तुम्हाला उबेर कॅब फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून चॅटच्या साहायाने बुक करता येणार आहे आणि यासाठी आपल्याला उबेरचे अॅपही डाऊनलोड करण्याची गरज नाही.

उबेरने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा कालपासून अमेरिकेत सुरु झाली असून अमेरिकेत सध्या ही सेवा अशा जागी उपलब्ध आहे जिथे उबर कॅबचे ऑपरेटर आहेत.

Leave a Comment