अॅंड्रॉइड डेव्हलपिंगचे २० लाख भारतीय तरुणांना देणार ट्रेनिंग – पिचाई

sunder-pichai
नवी दिल्ली- गुगलने माहिती आणि तंत्रज्ञानाची वाढती गरज लक्षात घेऊन येत्या तीन वर्षात एकूण २० लाख तरुणांना अॅंड्रॉइड डेव्हलपिंगचे ट्रेनिंग देण्याचे ठरवले असून भारतीय तरुणांना पुढील तीन वर्षात ३० विद्यापीठांच्या सहकार्याने अॅंड्रॉइड डेव्हलपिंगची ट्रेनिंग देण्यात येणार आहे.

या क्षेत्रात जास्तीत जास्त डेव्हलपर्स निर्माण होणे गरजेचे असल्याचे गुगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. जर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मुबलक अॅंड्रॉइड डेव्हलपर्स असतील तर आमचे अनेक प्रश्न सुटतील असे पिचाई यांनी म्हटले. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. तिथे येण्याआधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. पंतप्रधानांसोबत अतिशय चांगली चर्चा झाली असे ते यावेळी म्हणाले. भारतात अनेक सकारात्मक बदल झालेले दिसत आहेत असे ते म्हणाले. भारतात जे स्टार्टअप कल्चर सुरू झाले आहे ते निश्चितच स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले. भारतीय खेड्यांमध्ये इंटरनेट सुविधा पोहचावी म्हणून भारत सरकार सोबत गुगल एक प्रकल्प उभारणार आहे. त्यासंदर्भात त्यांची दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा झाली.

Leave a Comment